मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
निंबे नांदूर गावातील शेतकऱ्यांची कामधेनू असणाऱ्या निंबे नांदूर वि.का.से.सोसायटी यांचे कडून आर्थिक वर्ष सन २०२२/२०२३ चा लाभांश वाटप आज दि ०७/११/२०२३ रोजी सकाळी ठीक ९.३०० वाजता शनी मंदिर शेजारील सभामंडप मध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेवगाव पंस मा. सभापती डॉ. क्षितिज भैया घुले पाटील यांच्या शुभ हस्ते लाभाश लाभार्थीना चेक वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मा.सभापती श्री राजाजी बुधवंत, अहमदनगर जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री.भाऊसाहेब चेके साहेब, मधुकर चोधर उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शक करतांना सभापती घुले म्हणाले निंबेनांदुर विकास सोसायटी हि नेहमीच नफ्यात असून सभासद नियमित कर्ज घेऊन परत फेड करत आहे तर गावातील TDO अधिकारी नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहकार्य करत आहे तर सोसायटी नफ्यात राहून लाभांश वाटप करुन खऱ्या अर्थाने यंदाची दिवाळी हि गोड झाली आहे. तर माजी चेअरमन श्री कैलास बडे सर यांनी सोसायटी बद्दल अधीक महिती देताना सांगितले की, आपल्या संस्थेत 31/03/2023 पर्यंतचा नफा 17.19, 31/03/2023 चा नफा वाटणीवर 10% डेव्हिडड वाटप केला,एकूण पात्र कर्जदार 522 असून एकूण पात्र खातेदार यांचे नावे रक्कम 6,91,000 बँक खात्यात वर्ग केले आहे. यावेळी संस्थेचे चे.मन विक्रम चेके , रामनाथ बडे साहेब, माजी चे.मन कैलास बडे सर, अण्णा साहेब खोसे सह बँकेचे अधिकारी मधुकर चौधर साहेब, भागिनाथ तात्या बडे माजी सरपंच शहादेव खोसे ,उदय नाना बुधवंत, रंगनाथ पुंडे, अब्दुलभाई शेख, सोमनाथ दादा बडे, भागूजी खोसे, लक्ष्मण खोसे साहेब, जगन्नाथ चेके, एकनाथ यादव, जालिंदर काते, नारायण बुधवंत, एकनाथ बुधवंत, दुर्योधन बुधवंत, अशोक बुधवंत, विष्णुपंत बुधवंत, रंगनाथ चेके, राजेंद्र चेके , रमेश चेके, उत्तम वाकडे, साहेबराव वाकडे, नानासाहेब बडे, सुहास बडे, महेश बुधवंत, राजेंद्र चेके, हरीचांद्र रिंधे, भानुदास ढाकणे, शेषराव चेके, अंबादास चेके पोपट पावले, विक्रम बडे, एकनाथ बडे, राजेंद्र बडे, पत्रकार संजय केदार, अभी लांडे , सचिव बाळासाहेब अकोलकर, गणेश खोसेयावेळी सूत्र संचालन कैलास बडे सर, संजय बुधवंत सर, आभार प्रदर्शन पत्रकार शहादेव वाकडे यांनी केले तर संस्थेचे आजी माजी चेअरमन, संचालक मंडळ,सभासद सह ग्रामस्थ उपस्थित होते.


