अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : सार्थक वक्तृत्व अकॅडमी व सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत धुळ्याच्या धर्मेश हिरे याने प्रथम पारितोषिक पटकावून ‘प्रोफेसर डॉ. एम.आर.इंगळे राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक 2023’ हा बहुमान प्राप्त केला.फुले, शाहु,आंबेडकरी विचारवंत व सुप्रसिध्द वक्ते मा. प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे राज्यस्तरीय वक्तृत्व करंडकाचे आयोजन दि.२२ ॲाक्टोबर २०२३ रोजी सिताबाई कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.देशात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर तरुणांना अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणे आणि विचार मंथनातून लोकशाहीवादी नागरिक निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.बक्षिसे म्हणून प्रथम क्रमांक 10,000/- रोख , ट्रॉफी व प्रमाणपत्र व प्रत्येक विजेत्याला भारतीय संविधान, द्वितीय 7,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, तृतीय 5,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र चतुर्थ 3,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, पंचम 2,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, प्रोत्साहन पर १००० रुपयाची पाच बक्षीसे ट्रॉफी व प्रमाणपत्र व भारतीय संविधान असे बक्षिसाचे स्वरूप होते एकून ३२०००₹ ची बक्षीसे देण्यात आली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक धर्मेश हिरे-धुळे, द्वितीय क्रमांक लक्ष्मण कचरे- रायगड, तृतिय क्रमांक रितेश तिवारी- नागपूर, चतुर्थ क्रमांक यश पाटील- मुंबई,पाचवा क्रमांक साईनाथ महाद्वाड नांदेड. यांनी प्राप्त केला.प्रोत्साहन पर अनुक्रमे आदित्य टोळे-अकोला, तृप्ती भेनकर- अकोला,जयसेन सरदार- बुलढाणा,वेदिका शिरभाते- अमरावती,पार्थ खंडेलवाल- अकोला.यांनी पटकावीला. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणुन मा.डॉ.बी के विनकर, डॅा नितीन सराफ, प्रा अन्सार खान यांनी जबाबदारी पार पाडली.बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कि. सोनोने,ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यीक, अकोला, प्रमुख अतिथी वसंतदादा मानवटकर सुप्रसिद्ध शाहीर व कलावंत, अकोला, हे होते तर विचारमंचावर प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, डॅा सौ संगीता इंगळे, डॉ. कैलास वानखडे,
मार्गदर्शक म्हणुन प्रा. संजय खडसे,प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. समाधान कंकाळ, महेंद्र डोंगरे, संजय कमल अशोक आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवणारा हरहुन्नरी कलावंत विक्की मंगला मोटे यांचा सत्कार याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्पर्धेची पार्श्वभूमी प्रा राहुल माहुरे यांनी मांडली. स्पर्धक म्हणुन स्पर्धेच्या आयोजना संदर्भात राधीका दंडे, महेश उशीर यांनी आपली मते मांडली.त्यानंतर संजय कमल अशोक, डॅा कैलास वानखडे यांनी स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी म्हणुन वसंतदादा मानवटकर यांनी अशाप्रकारच्या वैचारीक प्रबोधनाच्या कार्यक्रमाची आज देशाला गरज आहे असे प्रतिपादन केले.डॉ. एम. आर. इंगळे यांनी ही स्पर्धा निरंतर सुरू राहील आणि महाराष्ट्रात मानाचे स्थान प्राप्त करेल असे सांगुन स्पर्धेला वाढता प्रतिसाद बघता स्पर्धेला सर्वदूर पर्यंत पोहचविण्याचे काम करु असे प्रतिपादन केले.डॅा संजय खडसे यांनी सांगीतले की, आजचा तरुण ही देशाची खरी संपत्ती आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.तेव्हाचं समाजाचा आणि देशाचा विकास होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ की सोनोने यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, देशातील समस्यांवर चिंतन करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण एकत्रित आले हे तरुण जागृत आहेत हे दिसून येते. विचारांचा जागर घालणारी ही स्पर्धा आहे. असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हागोणे तर आभार प्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा मनोहर वासनिक, प्रा प्रकाश गवई, प्रा.राहुल माहुरे, प्रा संतोष पस्तापुरे, प्रा.ॲड. आकाश हराळ,अजिंक्य धेवडे, आकाश हिवराळे, विशाल इंगळे,अमित लोंढे, अभय तायडे, निरज बडगे, आदीत्य बावनगडे,शुभम गोळे, नागसेन अंभोरे,रोहन काळे, सागर तेलगोटे, रोहीत पाटील, सुमेध पहुरकर, विशाल धांडे, सचीन पाईकराव, सलमान खान, संदीप मेश्राम, अमित वाहुरवाघ, चेतन डोंगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.