अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजनदान करण्यात आले.
नागपूर नंतर अकोल्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या धम्म मेळाव्याला लाखोंच्या संख्येने धम्म बांधव धम्म मेळाव्या साठी अकोल्यात येतात. ४० वर्षापासुन ही परंपरा अखंडीत सुरु आहे. या धम्म बांधवांना ४ क्विंटल व्हेज पुलावाचे अन्नदान यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॅा.ए.एल.कुलट यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचीरी तसेचं आजी व माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.श्री शिवाजी महाविद्यालय सातत्याने विविध सामाजीक उपक्रमात अग्रेसर असते. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॅा.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची विचारसरणी आत्मसात करुन महाविद्यालय समाजोपयोगी कार्यात हिरीरिने सहभागी असते. हे विशेष मागील २००७ पासुन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा पुरस्कृत डॅा. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने हा समाजपयोगी उपक्रम संचालक डॅा एम आर इंगळे यांच्या मार्गदर्शनात राबविला जात होता. त्यावेळी तत्कालीन प्राचार्य डॅा सुभाष भडांगे यांचे सहकार्य लाभत होते. दरम्यान च्या काळात विविध समाजोपयोगी कार्य या केंद्राच्या माध्यमातुन अविरत चालत होते. यामध्ये डॅा.बाबासाहेबांच्या दिक्षाभूमीवरील भाषणाला पुस्तक रुपाने प्रकाशीत करुन धम्म अनुयायांना त्याचे वाटप देखील करण्यात आले होते. असे विविध कार्यक्रम राबवीले जात होते. कार्यक्रमासाठी आजी व माजी विद्यार्थी कृती समीतीचे सिद्धार्थ बागडे, प्रा. राहुल माहूरे,
प्रा.ॲड. आकाश हराळ, आकाश हिवराळे, संजय खोब्रागडे, निरज बडगे, विशाल नंदागवळी, शुभम गोळे, कृष्णा क्षिरसागर, आदित्य बावनगडे, रोहित पाटील, सुमेध पहुरकर, संदीप मेश्राम अभिलाष बडगे, प्रकाश खंडारे, सूरज तायड़े, साहिल इंगले , अर्पण बौरासी,रोहित पथरोड़, नागसेन अंभोरे, तेजस भांबुळकर, निधि सिरसाठ, दीक्षा आठवले, यांनी सहकार्य केले.