संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी वर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे, त्या आंदोलनास महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे आंतरवाली सरटीचे लोन आता दौंड तालुकापर्यंत येऊन पोहोचले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याआंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी दौंड तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून गावोगावी साखळी उपोषण सुरू आहेत दौंड शहरासह तालुक्यातून ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळत आहे या आंदोलनात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व विविध संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. दिवसेंदिवस या आंदोलनची धार वाढत चालली असून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला दौंड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यामध्ये देलवडी, खुटबाव, यवत, मिरवडी, मेमानवाडी, खामगाव, दौंड च्या पश्चिम पट्ट्यातील अश्या असंख्य गावामध्ये कडकडीत बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.तर काही ठीक ठिकाणी मुक मोर्चाचे आयोजन ही करण्यात येत आहे.यावेळी मा. सरपंच मिरवडी सागर शेलार म्हणाले की
महाराष्ट्र सरकारनेही मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.सरकार जेवढं वेळकाढूपणा करेल तेवढे आंदोलन मोठे होत जाणार आहे.


