विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे सकल मराठा बांधवाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी एक दिवशीय लाक्षणिय उपोषण गुरुवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी अमर बौद्ध युवक संघटना भिगवण शहर यांच्या वतीने डॉ. आंबेडकर चौक भिगवण येथे करण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल बापुराव कांबळे यांनी हे एकदिवशीय लाक्षणिय उपोषण केलेआहे. यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार यांनी सांगितले की मराठा समाजाचा इतिहास पाहता या समाजाच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, भिगवणचे मा. सरपंच पराग जाधव, इंदापूर पंचायत समितीचे मा. उपसभापती संजय देहाडे, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.