अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 1 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील बोधडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या बाबत घाटंजी येथील गट शिक्षणाधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी यांचे कडे बोदडी येथील सरपंच उषा आत्राम सह गावकऱ्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे.
घाटंजी तालुक्यातील बोधडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. मात्र तेथील शाळेतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे शाळेकडे दुर्लक्ष असल्याने शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे शिजविल्या जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा वगैरे झाल्यास त्याला सर्वस्वी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जबाबदार राहणार असे लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लेखी तक्रारीवर बोधडी येथील सरपंच ऊषा आत्राम, भाजपा युवा मोर्चाचे घाटंजी तालुका अध्यक्ष चेतन जाधव, पवन अडसपुरे, भास्कर काकडे, विलास राठोड, प्रेमदास राठोड, अनंता नेवारे, रामराव आत्राम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)