अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील अनेक आडत्या – व्यापा-यांकडुन कापुस उत्पादक शेतकऱ्यांची लुट करण्यात येत असून यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार, घाटंजी येथील कापूस आडत्या – व्यापा-यांकडुन कृषी उत्पन्न बाजार समितीची कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी (जि. यवतमाळ) कापुस हिशेब पट्टी दिल्या जाते. मात्र, कापूस पट्टी वरील हिशोब व प्रत्यक्षात देण्यात येणा-या रक्कमेत तफावत असुन त्यात कट्टी म्हणुन कच्च्या पावतीवर पैसे कापुन यात संबंधित अडते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. घाटंजी तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकरी रमेश राठोड यांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस हिशेब पट्टी क्रमांक 10564 नुसार घाटंजी येथील अक्षय ट्रेडर्स या आडत्या – व्यापा-यास 18 क्विंटल 30 किलो कापूस विक्री केला. त्याचा एकुण हिशोब 1 लाख 82 हजार 534 रुपये एवढा झाला होता. परंतु प्रत्यक्षात 1824 रुपये कट्टी कापुन कच्च्या पावतीवर रमेश राठोड या शेतकऱ्यांला रक्कम देण्यात आली. तसेच 24 जुलै 2023 रोजी गोविंदपूर येथील कापूस उत्पादक शेतकरी बळीराम राठोड याने पावती क्रमांक 17265 अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस हिशेब पट्टी नुसार घाटंजी येथील आडत्या – व्यापारी सिमा माडुरवार यांस 10 क्विंटल 60 किलो कापूस विक्री केला. ज्याची रक्कम 68 हजार 764 झाली. परंतु या रक्कमेत कट्टी म्हणुन कच्च्या पावतीवर 687 रुपये कमी देण्यात आले. या वरुन घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व आडत्या – व्यापा-यांची मिली भगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदर प्रकरणाची यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक व घाटंजी येथील सहाय्यक निबंधक यांनी सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांचेशी संपर्क केला असता, मी सद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत व्यस्त आहे. तसेच बैठक संपल्यानंतर मी बोलेन, असे त्यांनी सांगितले. मात्र, कपिल चन्नावार यांची प्रतिक्रिया मिळु शकली नाही.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)