रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
राज राजेश्वर आरती मंडळाने ग्रहण काळात राजेश्वर मंदिरात सुंदरकांड सादर केले. ज्यामध्ये श्री राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळाने संगीतमय सुंदरकांड सादर केले ज्यामध्ये गायक सर्वश्री श्यामसुंदर शर्मा , कीर्तनकार नितीनजी गायकवाड यांनी ढोलका वर तर श्री राहुल जी पवनमारे ऑर्गन वर. तसेच सहगायकांमध्ये डॉ महेश जी इनानी, अतुल जी जोशी, दीपक जी तिवारी, अनिल नृपनारायण, अमित जी खंडेलवाल, गोपाल जी चौरसिया यांचा समावेश होता. तसेच सेवानिवृत्त फौजदार श्री अशोक जी मिश्रा सह परिवार श्री आनंद जी शास्त्री सहपरिवार यांच्या सह अनेक भक्तगण उपस्थित होते. आरती मंडळाचे महादेव भोंबळे, श्री राम भक्त, राजूभाऊ चाळसे, संजय शर्मा, संजय जसनपुरे, गोपाल भिरड, सचिन भिरड, नरेंद्र वानखडे.आरती मंडळ, प्रभाकर भोंबळे आदींसह राज राजेश्वर संस्थानचे विश्वस्त श्री नरेश जी लोहिया यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला.
रात्री 08/00 ते 10/00 पर्यंत सुंदरकांडानंतर आवाजाशिवाय मंत्रोच्चार करण्यात आले आणि त्यानंतर ग्रहण मोक्षापर्यंत भजन करण्यात आले.
वर्षानुवर्षे ग्रहणकाळात सुंदरकांड आणि नाम जपा ची परंपरा कै.श्री प्रभाकर जी चाळसे अध्यक्ष आरती मंडळ आणि सचिव श्री श्री राम भक्त यांनी सुरू केली होती, जी आरती मंडळ आणि सुंदरकांड मंडळ पाळत आहेत.


