उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: तळोदा तालुक्यात अल्प फायद्यासाठी कमी भावात चोरीच्या कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई पोलिसांनी व कृषी उत्पन्न बाजार समितीने करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.आधीच दुष्काळामुळे व कापसावरील रोगामुळे कापूस पिकाचे अल्प उत्पादन आलेले आहे अशातच तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील काही छोटे मोठे व्यापारी विना परवाना चोरट्यांनी चोरून आणलेला कापूस आपल्या फायद्यासाठी राजरोसपणे कमी भावात विकत घेत असून त्यांना पोलिसांचे किंवा बाजार समितीचे कोणतेही भय वाटत नाही अशाप्रकारे चोरीच्या कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी तालुक्यात व ग्रामीण भागात जागोजागी आपली दुकाने थाटली आहेत यामुळे तालुक्यातील कापूस चोरीत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकऱ्यांचे मेहनतीचे उत्पन्न चोरटे व व्यापारी यांच्या संगनमताने लुटले जात आहे.तरी याबद्दल पोलिसात किंवा बाजार समितीत आपल्या तक्रारीची दखल कोण घेणार किंवा तक्रार केली तर चोरट्यांवर किंवा व्यापाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होण्याऐवजी आपल्याच मागे चौकशीच्या ससेमीरा लागेल अशा समजुतीने शेतकरी तक्रार करीत नाहीत. शेतकऱ्यांचे कापूस चोरी ही प्रशासनाला किरकोळ बाब वाटते परंतु गरीब शेतकऱ्याचा तो जीवन मरणाच्या प्रश्न झाला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर पावसाच्या पिकावर सर्व वर्षभराची कमाई अवलंबून असते आणि कापसाचे पावसाळी पीक अशाप्रकारे चोरट्यांनी चोरून नेले तर वर्षभर त्यांनी उपजीविका कशी करावी हा प्रश्न त्याच्याकडे उभा ठाकतो तरीसुद्धा या कापूस चोरीच्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही व चोरीच्या कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही जर व्यापाऱ्यांनी कमी भावाच्या लोभातून चोरीच्या कापूस विकत घेतला नाही तर चोरटे चोरीच्या कापूस विकला जात नाही म्हणून चोरीच करणार नाही यामुळे कापूस चोरीला सर्वस्वी कमी भावात कापूस खरेदी करणारा व्यापारीच जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जाते. यास्तव अशा चोरीच्या कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सक्त कारवाई पोलीस प्रशासनाने करावी व कृषी उत्पन्न बाजार समितीने विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तळोदा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
” ज्या शेतकऱ्यांच्या कापूस चोरीला गेला आहे असे शेतकऱ्यांनी तक्रारी देण्यासाठी समोर यावं व कृषी उत्पन्न बाजार समितीने अशा चोरीच्या कापूस घेणारा विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईस्तव पोलिसांना अश्या व्यापाऱ्यांची नांवें द्यावीत तसेच कापूस चोरी होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन गस्ती वाहने कार्यरत केले असून ते ग्रामीण भागात नियमितपणे रात्रीची गस्त घालत आहेत” : राहुल पवार पोलीस निरीक्षक तळोदा


