शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.29 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोनाच्या समर्थनार्थ शासनाला चाळीस दिवसाची मुद्धत देऊन हि शासनाने कुठलीच हलचाल केली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाराजीचे सूर उमटले असून गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना,पुढऱ्यांना गाव बंदी प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो पर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. त्याच्याच परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याचेच पडसाद सेलू तालुक्यात निपाणी टाकळी,करडगाव,आंबेगाव, गोगलगाव, काजळी रोहिणा आदी ग्रामीण भागात तीव्र संताप निर्माण झाला म्हणून सर्वांनी मनोज जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी टाकळी येथे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी त्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये जाऊन लोकामध्ये जनजागृती केली त्याच्याच परिणाम आज समस्त मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला असून आज पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दि. 29 ऑक्टो. रविवार पासून सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले. त्यास अनेकांनी पाठींबा दिला. रघुत्तम आजबे,चंपत आजबे,अविनाश शिंदे डॉ. शिवाजी शिंदे,आनंद आजबे, नितिन आजबे, धनंजय आजबे,लक्ष्मण शिंदे,किरण शिंदे,शिवाजी ढगे, गणेश शिंदे, लखन शिंदे,दत्ता शिंदे बापूराव शिंदे, आदी समस्त मराठा समाज हे रविवारच्या या साखळी उपोषणास बसले आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्त मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा. असे सर्व समस्त मराठा समाजाची मागणी आहे.