विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अडगावं खुर्द :मिलिंद बुद्धविहार अडगावं खुर्द यते अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम
या कार्यक्रमात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ लिखित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे वाचक संदीप मनोहर गवई व प्रदीप हिंमत गवई यांनी बुद्ध धम्मावर प्रकाशमय असे वाचन करण्यात आले. सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व ते बुद्ध कसे झाले. त्यांचा जन्मापासून परी महापरिनिर्वाण दिनापर्यंत त्यांचा प्रवास हा कसा गेला. त्यांचा कायमचा गृह त्याग, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, तथागत बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, धम्मदीक्षेच्या मोहिमेस सुरुवात, कनिष्ठ आणि सामान्य जणांची धम्मदीक्षा, स्त्रियांचे धम्मदीक्षा, पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा, तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण, भगवान गौतम बुद्धांच्या धम्मा संबंधी विविध मते, धम्म म्हणजे काय? सद् धम्म म्हणजे काय? व सद् धम्माची कार्य, धम्म हा तेव्हाच सद् धम्म असतो जेव्हा तो प्रज्ञाची वृद्धी करतो, जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो, धम्म तेव्हाच सध्या म्हणायला जाऊ शकतो जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदभाव नष्ट करतो, वाचक प्रदीप गवई यांनी बौद्ध धम्माचा जीवन मार्ग, बुद्धांची प्रवचने, शीलपरीपालनाची प्रवचने, धम्मा वरील प्रवचने, महान परिवाजिरकांची अंतिम सारिका, भगवान बुद्ध आणि त्यांचे समर्थक, भगवान बुद्धांचे विरोधक, भगवान बुद्धांच्या धम्माचे टीकाकार, भगवान बुद्धांचे मित्र आणि प्रशनसक्, यावर वाचकांनी मार्गदर्शन केले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आचरणाुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 विजयादशमीच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि त्यांनी 22 प्रतिज्ञाचे पालन करून मार्गदर्शनपर अशा 22 प्रतिज्ञा त्यांनी म्हणून घेतल्या व त्यांचे कसोशीने पालन करावे अशा सूचना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विशाखा महिला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व सर्व विशाखा महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच संघमित्र महिला मंडळ, यांचे सहकार्य लाभले. अखेर संपूर्ण गावामधूम धम्म रत लेजीम मंडळाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये महिला मंडळ व बुद्ध उपासक यांनी ग्रंथवाचकाचे मनःपूर्वक अभिनंदन स्वागत केला, त्याचप्रमाणे बोद्ध पंचमंडळाचे पद अधिकारी दयाराम गवई, दादाराव गवई, मनोहर गवई, राजेंद्र जयराम गवई, शेसराव गवई, राजू बळीराम तायडे,गणेश गवई, श्रीराम शुभेदार, गुलाबराव गवई, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते अजाबराव गवई, दीपक गवई सुभाष देवमन गवई,इत्यादीनि कार्यक्रमाची रुप रेखा आखली, आणि त्याच प्रमाणे धम्म रथ रॅली मध्ये ग्रामपंचायत सरपंच सुनीता सोनोने, उप सरपंच अनिता गवई, व तंटा मुक्ती अध्यक्ष गजानन भिसे, व प्रमोद सोनोने (समाज सेवक )अमन गवई ग्रामपंचायत सद्यस्य.त्याच प्रमाणे मिलिंद बुद्ध विहाराचे कार्यकर्ते, भिम टायगर ग्रुप, नितीन गवई, संतोष गवई, अरविंद सोनोने, आनंद मेजर, व भिम राजे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अजय शुभेदार, सुरेंद्र गवई, रोशन नाजूक गवई, भूषण गवई, आकाश गवई, अनिल गवई, सिद्धार्थ दामले, भीमदास तेलगोटे, अनिकेत संतोष गवई, रोहित संतोष गवई, संदीप बाबाराव गवई, प्रशांत आग्रे, निलेश गवई, रामदास रायभान गवई, बंडू अजाबराव गवई आदित्य राजू गवई, इत्यादीचे सहकार्य लाभले. अखेर संपूर्ण गावामधून धम्म रत मिरवणूक काडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


