अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील माणुसधरी येथील प्रल्हाद श्रीराम पेंदोर याची अखील भारतीय गोंड आदिवासी संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड आर्णी – केळापूरचे आमदार तथा अखील भारतीय गोंड आदिवासी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप धुर्वे यांनी केली आहे.आदिवासी समाजाच्या हितासाठी, आदिवासी समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आदिवासी युवक प्रल्हाद पेंदोर याची निवड करण्यात आल्याचे आमदार डॉ. संदीप धुर्वे (आर्णी – केळापूर) यांनी सांगितले आहे.