रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तुका म्हणे येथे भजन प्रमाण ,काय थोरपण जाळावे ते ,या तुकोक्ति नुसार आजन्म वारकरी संप्रदाय व आपल्या घराण्याची परंपरा अखंड जोपासत सुज्ञांपासुन अज्ञांपर्यत आबालवृद्धांना आपल्या सुरेल आवाज व ओघवत्या वाणीने मंत्रमुग्ध करून भक्तिच्या मुख्य प्रवाहात आणणारे परम पूज्य बाबा महाराज सातारकर या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत .वैकुंठ वासी बाबा महाराज सातारकर एक द्रष्टे युग प्रवर्तक होते. वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांचे अतुलनीय योगदान होते. कैवल्याचा पुतळा नामक दुरदर्शन वरील साप्ताहिक कार्यक्रमामुळे अनेकांच्या मनला त्यांच्या वक्तृत्वाची पर्यायाने वारकरी संप्रदाया च्या तत्वज्ञानाची अतुट गोळी लागली होती. वैकुंठ वासी मामासाहेब दांडेकर यांच्या नंतर त्यांच्या मुळेच तथाकथित उच्चवर्णीय व उच्च विद्याविभूषितांचा संप्रदायाकडेपाहण्याचा दृष्टिकोन बदलून एक खुप मोठा वर्ग मतपरिवर्तन होऊन स्वेच्छेने भक्ति प्रवाहात आला व स्थिरा वला होता.ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरील त्रिदिवशीय कीर्तन महोत्सवा करीता श्रीयुत बाबा महाराज सातारकर आले असतांना त्यांची संतश्री वासुदेवजी महाराजांविषयी प्रेम व निष्ठा अनुभवायला मिळाली.त्यावेळी सुध्दा खुप मोठा वर्ग संप्रदाया च्या कार्यात संलग्न झाला व आजतागायत टिकून आहे याचा आम्हाला सार्थ स्वाभिमानी आहे.आम्ही मुंबईला ज्यावेळी कार्यक्रमा करीता जात असो त्यावेळी आवर्जून त्यांचे दर्शन आणि प्रत्यक्ष कीर्तनाचा योग येत असायचा . त्यावेळी ते आवर्जून संत वासुदेवजी महाराज बद्दल आस्थे वाईकपणे चौकशी करायचे व महाराजांना आमचा नमस्कार सांगा असा निरोप द्यायचे त्यावेळी त्यांचे महाराजांप्रतिचे प्रेम व नम्रता निदर्शनास येत होती.आज त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न
निघणारी आहे. श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या पावनस्मृतिस शतशः नमन.भागवता चार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.