मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
पाथर्डी : शेवगाव तालुक्यासाठी एमआयडीसी व शेतीसाठी पाट पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पाथर्डी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता दौंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात दौंड यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यावे दोन्ही तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात बेरोजगार, युवक श्रमिका ,कष्टकारी व ऊसतोड कामगारांची मुले आहेत त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर करावी ऊसतोड शेतकऱ्यांचे जीवनमान व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करावी असे म्हटले आहे, माजी सभापती सुनीता दौंड यांचे पती गोकुळ दौंड हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मागील महिन्यात त्यांनी भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका करून या मतदार संघात राजळे ढाकणे हे दोन कुटुंब राजकारणात घराणे शाही करत आहेत त्यांनी मतदारसंघाचा विकास केला नाही फक्त जातीपातीचे राजकारण केले अशी तोफ डागली होती, त्यानंतर आता दौंड दांपत्या आमदार राजळे यांच्या विरोधात भूमिका घेऊन मतदार संघात कामे होण्यासाठी सरकारमधील वरिष्ठ नेते मंडळीकडे पाठपुरावा करत असल्याचे दिसत आहे.