मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील शासकीय ग्रामीण रूग्णालयात घाटी याठिकाणी आठ ते नऊ वर्षा पासून सफाई कामगार म्हणुन काम करत असलेल्या सर्व महिलाना कामावरुन कमी करण्यांत आले. करोना काळात भयंकर व जागतीक महामारी दरम्यान स्वात:च्या व परिवाराच्या जीवाची पर्वा न करता. कोरोणा रुग्णांची व रुग्णालयातील साफसफाई काम रात्र दिवस निस्वार्थ पने करणाऱ्या बारा महिलांना कायम स्वरुपी करण्याऐवजी मागील १० दिवसापूर्वी त्यांना पूर्व सुचना न देता कामावरुन काढून टाकले आठ ते नऊ वर्षापासून घाटी रुग्णालयात १५० रुपये प्रती दीना प्रमाणे सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या महिलांना घाटी रुग्णालय इन्चार्ज आसलेल्या श्रीमती मुंढे व श्रीमती हिवराळे सिस्टर यांनी अचानक पने काही ही कारण नसताना कामांवर न येण्याचे आदेश या सर्व महिलांना दिले. आईनं दिवाळी सारख्या सणासुदीच्या तोंडावर या सर्व सामान गोरगरीब कुटूंबातील गरजू महिलांना कामावरुन काढून त्यांच्या तोंडचा खास हिरावून घेतला आहे.दिवाळी सनाचा गोडवा हिरावून घेऊन सफाई कामगारांचे दिवाळ काढण्याचे षडयंत्र
शासकीय रुग्णालय येथील अधिकारी यांनी केला असून. त्यांच्या परिवाराच्या उपजिविकेसाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कामांची आवश्यकता आहे. कामावरून काढून टाकल्याने या महिलांच्या घरातील लहान मोठ्या वर उपवास मारीची वेळ येणार असल्याने.सफाई कामगार महिलांवर अन्याय झाला आहे. याकरिता सर्व महिलांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पैठण येथील वैद्यकीय वरीष्ठ अधिकारी यांना २३. ऑक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले.आठ दिवसांच्या आत कामांवर घ्या शासकीय नियमानुसार सर्व सुविधा द्या अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.अम्रपाली शंकर चाबुकस्वार,पुनम राजू लाहोर,रेखा प्रकाश खंडागळे, वर्षा विष्वास, खरात,आसमा शहेद पठाण,नंदा रविंद्र खुटेकर,पुष्पा संजय पहिलवान,निर्मला पुंजाराम खरात, ज्योती नितीन आडसूळ,बिरमती सत्यवान डूलगज,मोहिनी आमोल खुटेकर,सुनिता दिपक विरसे, या सर्व महिलांनी शासकीय वरीष्ठ अधिकारी यांना कामांवर घेण्यासाठी निवेदन सादर केले
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)