फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
उदापूर : ता. जुन्नर आदर्शगाव बल्लाळवाडी येथील नवदुर्गा नवरात्रौत्सव मित्र मंडळ यांनी आधुनिक युगातील डीजे, बँजो या वाद्याला फाटा देत एक स्तुत्य उपक्रम राबवून भक्ती शक्ती गुरुकुल कळंब येथील वारकरी संप्रदायातील जवळपास ७० ते ८० मुलांची दिंडी काढून टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच ज्ञानोबा तुकाराम व आई अंबेच्या जयघोषानेदेवीची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पारंपारिक पद्धतीने पार पडली.नऊ दिवस अतिशय उत्तम प्रकारे देवीची विधिवत पद्धतीने पूजन, होमहवन,महा आरती, रास दांडिया, संगीत खुर्ची, लहान मुलांच्या स्पर्धा तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात अन्नदान ही करण्यात आले असल्याची माहिती मंगेश नायकोडी, अविनाश नायकोडी, जितेंद्र नायकोडी यांनी दिलीआई जगदंबेच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीला दुपारी चार वाजता झाली यावेळी आलेल्या दिंडीतील लहान मुलांनी टाळ मृदुंगावर ठेका धरत दहीहंडी करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी गावातील समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले.