फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतुर पोलीस स्टेशन हद्दित दि.१६/९/२०२३ रोजी रात्री ८.०० वा.ते दि.१७/९/२०२३ रोजी सकाळ ०६.०० वा.चे दरम्यान ओझर नं.१, ता:- जुन्नर,जि.पुणे येथील शेतकरी संतोष सुदाम मांडे यांनी घरासमोर अंगणात लावलेली बजाज डिस्कव्हर मोटार सायकल नं. एम एच १४ डिजी ६६५१ चोरीस गेलेबाबत तसेच त्यानंतर दि:- ४/१०/२०२३ रोजी रात्री १०.०० वा.चे सुमारास संतोष मांडे यांचेच शेतातील बांधावरचे चंदनाचे झाडे तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न झाले बाबत संतोष सुदाम मांडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून ओतुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. त्यानंतर दाखल गुन्हयाचे तपासात निष्पण्ण आरोपी शिवाजी अभिमन्यु सुर्यवंशी,वय २६ वर्षे, रा:- डोळासणे,ता:- संगमनेर,जि:- अहमदनगर यास अटक करणेत आली असुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली बजाज डिस्कव्हर मोटार सायकल नं.एमएच १४ ,डिजी ६६५१ ही हस्तगत करणेत आली आहे. यावेळी या आरोपीकडे सखोल चौकशी केली असताअटक आरोपी शिवाजी अभिमन्यु सुर्यवंशी याचेकडे आणखी एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल नं.एमएच १४ डीई ३९१५ही मोटार सायकल मिळुन आली असुन ती त्याने अवसरी (मंचर) ता:- आंबेगाव, जि.पुणे येथुन चोरली असुन त्याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. याप्रमाणे आरोपी शिवाजी अभिमन्यु सुर्यवंशी,वय २६ वर्षे,रा:-डोळासणे,ता:- संगमनेर,जि:- अहमदनगर याने ओतुर पोलीस स्टेशन हद्दिमध्ये मोटार सायकल व चंदन झाडे चोरी असे २ गुन्हे व मंचर पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा असे एकुण ३ गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाले असून.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण:- मितेश घट्टे, विभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. एस.व्ही. कांडगे, पो. हवा.महेश पटारे,पो. हवा.बाळशीराम भवारी,पो.कॉ मनोजकुमार राठोड, पो. हवा.आनंदा भवारी, पो.ना.नदीम तडवी, पो. ना. संदिप लांडे, पो. हवा.डी. आर. पालवे,होमगार्ड चंद्रकांत जाधव,सुमीत ससाणे,राहुल फलके यांनी केली आहे.