मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत : साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमीला हळद व सोयाबीन पिकांना चांगला भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र पूर्ण मुहूर्ताच्या दिवशीही दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून आले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बिटमध्ये हळदी 4 हजार कट्टयाची आवक झाली. बिटा येथे दोन महिन्यांनी हळदीला १६ हजार रुपये तर सोयाबीनला ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला. गतवर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल ५००० रुपये भाव मिळाला होता. यंदा अधिक भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली. हळद, सोयाबीन, कापूस ही पिके शेतकऱ्यांना मदत करतात. या पिकाची भरभरून वाढ व्हावी यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र यंदा सोयाबीनवर
‘ येलो मोझॅक’ व ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव हळदीवर पडला.अशा वेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जाऊन मार्गदर्शन केले पाहिजे.


