संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो जसे की फटाके,केक ,मोठ मोठे गिफ्ट , पंचपकवानाची मेजवानी ते पण पंचतरणकित हॉटेल मध्ये परंतु एकेरीवाडी येथील विक्रम टुले व सुप्रिया टूले यांनी आपल्या मुलीचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलीच्याच अंगणवाडी शाळेमध्ये ४० प्रकारची फळे ,फुले ,व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली.
वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत विक्रम व सुप्रिया यांनी वृक्षरोपण केले असल्याचे त्यांनी सांगितले. एक झाड आपल्या सात ते आठ पिढ्यांना मोफत ऑक्सीजन पुरणार आहे त्यामुळे आता झाडे लावली तर येणाऱ्या पिढ्या निरोगी राहतील व सर्वांनीच आपल्या किंवा नातेवाईकांच्या वाढदिवसा दिवशी एक तरी झाड नक्की लावावे असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. विक्रम व सुप्रिया हे उचशिक्षित असून त्यांचा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे. यावेळी देलवडी वि का चे चेअरमन रामकृष्ण टूले, संचालक सोनबापू टूले माजी उपसरपंच सचिन टूले, नितीन टूले, एकेरीवाडी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधीर टुले,संतोष जगताप, अशोक वाघमोडे,अनिल सावंत,संजय जगताप, मोहन जगताप सह ग्रामस्थ उपस्थित होते.










