शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : दि.25 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोनाच्या समर्थनार्थ शासनाला चाळीस दिवसाची मुद्धत देऊन हि शासनाने कुठलीच हलचाल केली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाराजीचे सूर उमटले असून गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना,पुढऱ्यांना गाव बंदी प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो पर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. त्याच्याच परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याचेच पडसाद सेलू सारख्या ठिकाणी उमटले असून आज समस्त मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला असून आज पासून लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ बुधवारपासून सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले. त्यास अनेकांनी पाठींबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन समाजबांधवांनी हे उपोषण सुरु केले. अशोक सेलार, जयसिंग शेळके, प्रसाद काष्टे, गणेश ढेंगळे, गोविंद शिंदे, शाम जंगले, अनिकेत शिंदे, सचिन चव्हाण, संतोष राऊत हे बुधवारच्या या साखळी उपोषणास बसले आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्त मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा. असे सर्व समस्त मराठा समाजाची मागणी आहे.


