विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी, अकोट
अकोट : अकोला येथे शासकीय विश्रामगृह पदाधिकारी मेळाव्यात स्वराज्य संविधान रक्षक पॅंथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे, यानी मार्गदर्शन करताना आजची परिस्थिती बघून बहुजन समाजा वरील अन्याय अत्याचार जर आपल्याला रोखयचा असेल तर आपल्याला संघटन करायला पाहिजे त्या विरोधात आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. आणि हे कार्य पॅथर आमीॅचे सर्व सदस्य गण यामध्ये तळमळीने कार्य करत आहे. त्यात पुन्हा योग्य पध्दतीने कार्य कसे करता येईल यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन सभेमध्ये चर्चा केली, आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान पद्धतीने आणि संविधानाच रक्षण करण्यासाठी जो पक्ष संविधानाच्या गोष्टी करेल आणि जो पक्ष संविधान वाचवण्यासाठी समोर येईल आणि या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्याचा काम करेल त्या पक्षासोबत आंबेडकरी समाजाने जावं, तसेच महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आणि जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचे आव्हान या मेळाव्यामध्ये करण्यात आले, तसेच युवकांनी तथा महिलांनी युवतींनी जास्तीत जास्त संघटन मध्ये काम करून समाज हितासाठी, समाज रक्षण करण्यासाठी आणि आपल्या देशाचं संविधान आबादी ठेवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या पिढीने एक संविधानिक घटक म्हणून संघटनेमध्ये सामील होऊन या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आव्हान केले आहे. त्यांचा नावावर महाराष्ट्र मध्ये अनेक संघटना आहेत आणि या संघटनांमध्ये तरुण मुलं जास्त संख्येने सहभागी होत आहेत ज्या मुलांचे वय 18 पेक्षाही कमी आहे किंवा 18 वर्षे वय अशी मुलं संघटनेमध्ये काम करत आहेत अशा मुलांच्या भविष्याचा विचार करून अशा शिक्षणाचा विचार करून यांच्यावर उद्या केसेस जर लागल्या तर संघटनेचा कोणी यांच्या पाठीमागे येत नाही त्या कारणाने संघटनेमध्ये सामील होत असताना आपल्या संघटनेचा नेतृत्व आणि संघटनेची एक दिशा या कारणाने ओळखून आपण त्या संघटनेमध्ये सहभागी व्हावं असं सुद्धा या मेळाव्यामध्ये उपस्थितीमध्ये बोलताना सांगितले. संघटनेच्या नावावर समाज हितासाठी आणि समाजाकडून पैशाची जी मागणी कोणी करत असेल तरी समाजाने त्याला त्याची जागा दाखवावी हे सुद्धा यावेळेस चेतन भाई इंगळे यांनी बोलताना सांगितले. त्यावेळेस उपस्थिती पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष सुशील दादा जाधव, पॅन्थर राहुलभाई सोळंके,
मनोहर (बापू) मैंदकर सचिव महाराष्ट्र प्रदेश कोकण प्रदेश अध्यक्ष कोमल शहा, उपाध्यक्ष प्रीती खोब्रागडे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगताप, विदर्भ अध्यक्ष नरेंद्र इंगळे, शीतल गायकवाड, अमरावती महिला जिल्हा अध्यक्ष रीना गायकवाड,
अमरावती जिल्हा अध्यक्ष अतुल मसुले, कर्जत तालुका युवा अध्यक्ष रोहित अनंता जाधव
नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कल्याणी नंदेश्वर, रायगड अध्यक्ष. रोशन मोरे, वाशीम जिल्हा अध्यक्ष आशा तायडे नरखेड तालुका अध्यक्ष कविता ताई शेडें , कविता शेंडे, काटोल ता अध्यक्ष, सुजाता बागडे,नवल दांडगे, सौरभ इंगळे, जय गायकवाड, रोशन इंगळे, रॉकिंग निल, संदीप तेलगोटे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अतुल मसुले व आभार प्रदर्शन बापू मैंदकर यांनी केल आणि अशाप्रकारे व्यवस्थितरित्या मेळावा सपन्न झाला.