सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : २४ ऑक्टोबर २०२३ बीड जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन आणि विजयादशमी दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी बौद्ध विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास परळी वैजनाथ येथील भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल, सम्राट अशोक विचारमंच परळी वैजनाथ बौद्धजन समिती तथा परळी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरीक यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दल परळी कंपनी बीड बटालियनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली व त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या बौद्ध धम्म अधिवेशन व समता सैनिक दलाचे मराठवाडा विभागीय अधिवेशनात बीड पूर्व जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष तथा डिव्हिजनल ऑफिसर डॉक्टर स्वप्नील महाळंगीकर यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाच्या सैनिकांनी जास्त संख्येने उपस्थित राहून चोख बंदोबस्त केला होता त्यामध्ये परळी कं बीड बटालियन ने मराठवाड्यातून तिसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल आज विजया दशमी दिनाच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास परळी वैजनाथ तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.