भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर -बौध्दभुमी परीसर माहुर बौद्ध भुमी परीसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शहरातील प्रतिष्ठित नागरिक समानतेच्या योगाने सामाजिक आणि सांस्कृतिक गुणवत्ता आणि प्रासंगिकता या धोरणाच्या बाबतीत सदा अग्रेसर असणारे कादर दोसानी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .सागरासारख्या अगाध अशा बौद्ध धर्माचा सांगोपांग अभ्यास करून बौद्ध धर्म आजच्या दिवशी म्हणजे विजया दशमी (दसरा)या पावन दिवशी धम्म दिक्षा घेतली.याचे औचित्य साधून कादर दोसानी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला सोबत आंबेडकरी चळवळीतील नेते रेणुदास वानखेडे यांनी सुध्दा पुष्पहार अर्पण करून धम्मचक्र परिवर्तन दीन बौद्ध भुमी परीसर माहुर नगरीत अत्यंत हर्षात साजरा केला.