मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: चांदूर रेल्वेचे माजी शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे विश्वासू आणि निकटवर्ती गणेश रॉय यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रदेण्यातआले.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब भाई शेख,माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गणेश रॉय यांच्या नियुक्तीबद्दल शहर व जिल्हा अधिकारी हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शरद तसरे,हेमंत देशमुख, विनेशआड़तिया, सुनील वऱ्हाडे, अनिल ठाकरे, प्रदीप राउत, शोएब खान, संगीता ठाकरे, अमोलमोहोड़,प्रकाशबोंडे,शरददेवरणकर,अरुण पाटिल व येथील माजी नगरसेवक,प्रतिष्ठत नागरीक मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष गुड्डू शर्मा ,बंडूआठवले,अभिजित तिवारी,राजेश सराफी मंगेश बोबडे भेट देऊन अभिनंदन केले।