अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव ता 24 -अकोला जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग मध्ये ब्रांझ पदक मिळविल्याबद्दल मोहम्मद सोहेल शेख सलीम गौरवे याचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज ता 24 रोजी मेडशी येथे करण्यात आला.मोहम्मद सोहेल हा अकोला येथील न्यू इंग्लिश स्कुल चा8 व्या वर्गाचा विद्यार्थी आहे .त्याला वडील नाहीत .त्याची आई त्याचे शिक्षण करीत आहे त्यालाशिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आवड आहे बॉक्सिंग हा त्याचा आवडता खेळ .क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा अकोला येथे पार पडल्या या स्पर्धेत ब्रांज पदक मोहम्मद सोहेलला मिळाले त्याबद्दल त्याचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे चे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केला. यावेळी ते म्हणाले की सोहेल अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेत आहे .त्याने जिद्द चिकाटी ने यश मिळविले आहे त्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे ते म्हणाले
कार्यक्रमाला समता परिषदेचे जिल्हा सचिव विठ्ठल भागवत ,जावेद भवानी वाले, धननु भवनिवाले संतोष तायडे ,प्रफुल्ल साठे ,सचिन साठे ,मोहसिन भवानिवाले आदी उपस्थित होते.


