कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दि.24 ऑक्टोबर रोजी सोनाळा येथे विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.अशोक विजया दशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायां सोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे.भारत भूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत “धम्मचक्र प्रवर्तन” केले; तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांनी बौद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.या कार्यक्रमासाठी प्रणव घोडेस्वार,प्रविण मेहनकार मिलिंद वानखडे, निलेश तायडे,प्रदीप उमाळे तसेच इतर गावकरी उपस्थित होते.