कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथील एकता नवदुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने दि.24 ऑक्टबर रोजी दसरा उत्सव निमित्त महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंडळ चे अध्यक्ष सागर आतकड उपाध्यक्ष अंकुश देशमुख तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी देवीचे पूजन करून पुष्प अर्पण केले. महा आरतीला सर्व वार्ड मधील पुरुष महिला,आवरजुन उपस्थित राहले. यामध्ये महा आरतीचे विशेष महत्व प्रणव घोडेस्वार यांनी सांगितले.यामध्ये शंकरनाथ विश्वकर्मा,चेतन लव्हाळे, शैलेश ठाकरे,संदीप आखरे, पवन दाभाडे,मिलिंद वानखडे,अतुल देशमुख,जयप्रकाश विश्वकर्मा,विशाल धारपवार उपस्थित होते.शेवटी सर्वांनी दर्शन घेऊन महा आरती चा समारोप केला.


