गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : रायपूर येथील रहिवाशी एका गरीब कुटुंबात जन्मलेले अरबाज खान फिरोज खान वय (16)हे आपल्या घराच्या टीनपत्रावर चढले असता टीना खालील लाकडी बल्ली तुटल्यामुळे ते खाली घरात पडले व वरती टिनावर असलेला दगड त्यांच्या डोक्यावर पडला त्यामुळे त्यांच्या मेंदूला इजा झाली. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना साई न्यूरोसिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. अरबाज ची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सारथी परिवार जिल्हा बुलढाणा व्हाट्सअप ग्रुपचे समाधान पाटील आणि सादिक भाई यांना मदत जमा करण्याची विनंती केली. सारथी परिवाराने ही क्षणाचाही विलंब न करता मदत करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व सार्थी टीमने एक हात मदतीचा हा उपक्रम अरबाज साठी राबवला आणि मदत करण्याचे आवाहन केले. हळूहळू मदतीचा ओघ सुरू झाला आणि दोन ते तीन दिवसांमध्ये 35 हजार रुपये जमा झाले. जमा झालेली धनराशी समाधान पाटील आणि सादिक भाई यांनी थेट छत्रपती संभाजी नगर गाठून अरबाज खान यांच्या वडिलांकडे जमा केली. या अगोदरही बुलढाणा जिल्हा सारथी परिवार या व्हाट्सअप ग्रुपने संग्रामपूर आणि जळगाव जामोद येथे झालेल्या अतिवृष्टीतील बांधवांसाठी असाच एक मदतीचा हात दिला होता.