सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी वैजनाथ येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मुलन शिबीराचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून परळी वैजनाथ येथील मिलींद नगर येथे एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मुलन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अंधश्रद्धा तथा श्रध्दा, अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या, क्या राशी भविष्य शास्त्र हे, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रत्यक्षिक अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रभारी हरयाणा, राजस्थान वरीष्ठ केंद्रीय शिक्षक आद. एम. डी. सरोदे सर , जिल्हाध्यक्ष बीड पुर्व भारतीय बौद्ध महासभा चे केंद्रीय शिक्षक बी.बी. धन्वे सर यांनी यावेळी आलेल्या सर्व शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. शिबीराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. प्रजावतीताई कांबळे भारतीय बौद्ध महासभा परळी वैजनाथ शहराध्यक्षा, या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभा परळी तालुकाध्यक्ष आद. हनुमंत वाघमारे यांनी केले तर सुत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा परळी तालुका सरचिटणीस तथा डिव्हीजन ऑफिसर समता सैनिक दल आद. यशपाल बचाटे तथा भारतीय बौद्ध महासभेच्या परळी शहर सरचिटणीस आद. रंजनाताई मस्के यांच्यासह समता सैनिक दल आणि परळी शहर आणि परळी वैजनाथ तालुक्यातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.