मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि. 22/10/2023 आज सकाळी सुमारे आठच्या दरम्यान परळी तालुक्यातील भोपला गावचे रहिवासी महादेव मुंडे वय 40 वर्षे यांचा परळी शहरातील वनविभाग कार्यालय समोर तहसील कार्यालय रोड येथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला आहे. ही घटना तीक्ष्ण धारदार शस्त्राने वार करून निर्घृण पणे खून करण्यात आला असे दिसून येत आहे. या घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण अधिक झाले असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अशा घटना घडवुन आणणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर शासन करण्यात यावे अशी चर्चा जनतेकडून सर्वत्र होत आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत व घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलीस करीत आहेत.