तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव :आज नवरात्रोत्सव निमित्ताने शेवगाव चे कर्तव्यदक्ष तहसीलदार मा आदरणीय प्रशांत सांगडे साहेब व त्यांचे वडील मनोहर सांगडे साहेब व तहीलदारा साहेब यांची कन्या तसेच गटविकास अधिकारी राजेश कदम व अप्पर तहसीलदार गुरव साहेब यांनी आज मळगंगा देवस्थान मळेगाव याठिकाणी आई मळगंगा मातेची आरती करून मनोभावे दर्शन घेवुन सर्व भाविकासमवेत संवाद साधला.आणि नवरात्रोत्सव निम्मितान सर्वाना शुभेच्छा दिल्या,यावेळी परिसरातील मोठ्या संख्येन महिला आणि भाविक भक्त उपस्थित होते व त्यांचा छोटासा सन्मान मळगंगा मिञ मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला.


