अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील खंड १ व २ मध्ये अनधिकृत लेआउट पाडून कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी न घेता विनापरवानगीने अवैध कार्य सुरू केले आहे. संबंधित अवैध पणे ले आऊट करणाऱ्या व डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांवर करवाई करण्यात यावी अशी मागणी उमरखेड चे पत्रकार शेख इरफान यानी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली आहे.काही जागेवर नगरपालिकेचे प्लेग्राउंड आरक्षित केलें आहे. ते शॉपिंग मॉल व प्लॉटिंग पाडून डेव्हलपमेंट करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 ची कलम 53 54 अनुसार कारवाई करण्यात यावी. प्लॉटिंग घेणारे व्यक्तीची फसवणूक करून त्यांना अनधिकृत खरेदी न देता नोटीवर अनधिकृत विक्री व त्याला दिले जात आहे . त्यामुळे नगरपरिषद महसूल चा लाखो रुपयाचा महसूल देखील बुडत आहे.
असे निवेदनातून कळविण्यात आले आहे.











