सोहेल खान
शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पांढरकवडा – कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आज दिनांक १९ ऑक्टोबर रोज गुरुवारला करण्यात आला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बिशनसिंग शिंदो यांनी काटा पूजन करून प्रथम शेतमाल घेऊन येणारे दोन शेतकरी ज्ञानेश्वर कोटरंगे,हणमंतराव बोमकंटीवार यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने फेटा बांधून हार व श्रीफळ तसेच लक्ष्मीची १० ग्रॅम चांदीची नाणी भेट देऊन सत्कार करण्यात आला.सोयाबीनचा लिलाव केला असता जास्तीत जास्त भाव ४५९० या दरात मा.रेणुका ट्रेडर्स यांनी खरेदी केला.या प्रसंगी बाजार समिती चे उपसभापती गंगारेड्डी क्यातमवार,माजी सभापती जानमहमंद जीवांनी,माजी सभापती संतोष बोरेले,माजी उपसभापती प्रेम राठोड,सदस्य राकेश नेमनवार,दौलत आडे,विशेष कुळसंगे,निलेश मंचलवार,सुहास कापर्तीवार,वीरेंद्र तोडकरी,निमिष मानकर,अनिल अंगलवार,इलियास सिद्दीकी,विलास भोयर,सौ.इंदिराताई मिलमिले,सौ.कविता तालकोकुलवार व तालुक्यातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते.











