संतोष टाक
तालुका प्रतिनिधी चाकुर
दि.21 चाकूर व अहमदपूर तालुक्यामध्ये चर्चा आहे ती भारत राष्ट्र समितीचे नेते उत्तमराव वाघ यांची, गेल्या अनेक दिवसापासून उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वामध्ये बी आर एस पक्षांमध्ये चाकूर तसेच अहमदपूर परिसरातील अनेक दिग्गज प्रवेश घेताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य यांचा प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसह होत असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे बी आर एस नेते उत्तमराव वाघ यांचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून अनेक सर्वसामान्यांच्या अडचणी ला कोणतीही वेळ न पाहता धावून जातात सर्वसामान्यांची जाण असणारे तसेच बी आर एस चे कार्य तळागाळातील सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे च अनेक कार्यकर्ते दिवसेंदिवस मोठ्या संख्येने बी आर एस पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत ग्रामपंचायत सदस्यासह अनेक इतर पक्षातील कार्यकर्ते हे उत्तमराव वाघ यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतर पक्षातील स्थानिक नेत्यापुढे तगडे आव्हान राहणार आहे.
नागरिकांमध्ये व परिसरामध्ये भावी आमदार म्हणून उत्तमराव वाघ यांची जोरदार चर्चा रंगत आहे त्याच अनुषंगाने भारत राष्ट्र समितीचे उत्तमराव वाघ यांनी जोरदार मोर्चा बांधणी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून बघितले जात आहे त्याच अनुषंगाने आज त्यांच्याकडे जनतेचा कौल आकर्षित झालेला दिसत आहे. सद्य परिस्थितीचे राजकारण पाहता लोकांच्या मनामध्ये एक भक्कम पर्याय म्हणून बीआरएस चे नेते उत्तमराव यांना चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघामध्ये भावी आमदार म्हणून पाहिले जात आहे. आपल्या अनेक प्रश्नांवर बाजू मांडत असताना शेतकरी सर्वसामान्य मध्यमवर्गी या सर्वांचा बारकाईने हिताचा विचार तसेच अनेक तरुण युवकांना रोजगार व महिलांना काम आणून देण्याचे संकल्प त्यांच्या वतीने करण्यात येत आहेत.











