संतोष टाक
तालुका प्रतिनिधी चाकुर
महाविकास आघाडीच्या काळात कॉन्ट्रॅक्ट भरतीला सुरुवात झाली तसेच खाजगीकरणाला सुरुवात झाली परंतु उद्धव ठाकरे गट,शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी हे पाप भाजपाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे पाप या तिन्ही पक्षांनी केले हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे असे चाकूर भाजपच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे महाविकास आघाडीचा ढोंगी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आज निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्याच्या फोटोना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, ता अध्यक्ष वसंतराव डिगोळे, अंकुश जनवाडे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, नगरसेवक नितीन रेड्डी, नगरसेवक साई हिप्पाळे,युवराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हणमंतराव पाटील,बालाजी पाटील, रमेश पाटील,रणजित मिरकले,शाम मुंजाने, शंकर डोंगरे, प्रशांत बिबराळे, अशोक शेळके, शिवाजी माने, बाळू हाके, लहू बोमदरे, बाळू कांबळे, गजानन करेवाड, हाकानी सौदागर,दयानंद सूर्यवंशी,किरण मोहनाळे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.