अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थी विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये भाग घेऊन नेत्र दीपक यश संपादन केले.क्रीड़ा व युवक संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यामाने विभागीय शालेय मैदानी स्पर्धा दिनांक 17 ऑक्टोबर 2023 अकोला येथे आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये तुळसाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.वयोगट 17 वर्षे मुले 1) पूर्वेश उपरवट याने 110 मीटर हर्डल्स धावणे द्वितीय क्रमांक मिळवून हा विद्यार्थी शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह या ठिकाणी 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन शाळेतील क्रीडा शिक्षक एस आर मुखाडे,एस आर खाडे यांचे लाभले.विद्यार्थ्यांच्या कार्याचा गुणगौरव तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर चे प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर एस डेंगे, पर्यवेक्षिका कु.पी एम कारस्कर, जगमोहनसिंह गहिलोत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.