विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली :सेनगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी युवकच्या वाशिम जिल्हा प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गोरगरीब,शेतकरी,कष्टकरी यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाशिम जिल्हा प्रभारी पदी नुकतीच त्यांची निवड करण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात व त्यांनी डीएड,बीएड संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे व तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासन दरबारी आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याने त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाशिम जिल्हा प्रभारी पदी निवड करण्यात आली असून वाशिम जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.