अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींची लोकवस्ती असल्याचे दिसून येते,पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे आणि या लोकसंख्येपैकी निम्मापेक्षा जास्त तरुण-तरुणींची संख्या पालघर मध्ये दिसून येते, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये खूप सारे विनाशकारी प्रोजेक्ट सुरू असून पालघर जिल्ह्यातील आदिवासींवर मोठा अन्याय होत आहे, तसेच वेळोवेळी पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या घटनेद्वारे अन्याय केला जातो मात्र पालघर जिल्ह्यातील तरुण-तरुणी या सर्व गोष्टीकडे कोणीच लक्ष न देता तो फक्त नाच गाना करण्यापुरतेच आहेत की काय? जिथे नाचायला आणि आनंद घ्यायला भेटेल तिथे मात्र तरुण-तरुणी विनाकारण गर्दीत करीत असतो मात्र ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ठिकाणी एकत्र येण्याची वेळ असते त्या ठिकाणी हे नव तरुण-तरुणी अशा गोष्टींना पाठिंबा न देता आपला काढता पाय घेताना दिसून येतो, या दरम्यानच्या काळामध्ये एक विषय असाही उद्भवला की पालघर जिल्ह्यामध्ये पेसा भरतीची जाहिरात आली आणि पेसा भरतीसाठी पदेही निघाले मात्र आदिवासी समाजातील तरुण तरुणांमध्ये पात्र आणि अपात्र असे दोन गट तयार झाली आणि दोघांमध्येही अस्वस्थता निर्माण होऊन या दोघांच्या अस्वस्थतेचा फायदा घेऊन ओबीसी समाजाने घेतला असल्याचे दिसून आले. आदिवासी समाजाच्या पेसा भरती होत्या या पेसा भरती वरती हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांची नियुक्त्या देण्याच्या दरम्यानच्या काळात थांबवलेल्या आहेत, तरीसुद्धा पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील तरुण-तरुणी झोपलेल्या आहेत की काय? कारण एवढं होऊन सुद्धा तरुण तरुणी या सर्व गोष्टींना विरोध करताना दिसूनच येत नाही, सध्या नवरात्री उत्सव जोरात सुरू असल्या कारणामुळे हे सर्व नव तरुण तरुणी सध्या नाच गाण्यांमध्येच गुंतलेली आहेत की काय असाच एक प्रश्न समाज बांधवांना पडलेला आहे?











