अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
दि.6 सप्टेंबर, कासा येथे महाविकास आघाडी कडून या वर्षी गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडी चा उत्सव करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत यावर्षी कासा या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यासाठी जोरदार तयारी केली असून मानाची दहीहंडी फोडणाऱ्यांना ग्रुप साठी ₹ 33,333 रुपयांची आकर्षक बक्षीस ठेवून, आकर्षक अशी कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे तसेच बबलू पाटील बिट्स लाईव्ह डीजे ऑर्केस्ट्रा, त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे गाजलेले युट्युब कलाकार या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार असल्याचे समजलेली आहे, दरवर्षी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमापेक्षा यावर्षीच्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम हा आगळावेगळा करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या निमित्ताने हा गोकुळाष्टमीचा उत्सव ठेवण्याचे ठरवले आहे आणि याचीच तयारी आज पूर्ण कासा बाजारपेठेमध्ये दिसून आलेली आहे.