राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर: आज 5 सप्टेंबर रोजी अमरापुर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ,कर्मयोगी आबासाहेब काकडे स्व.निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी कुमारी शिफा गारुडी हिने तर प्रास्ताविक कु.पोटफोडे प्रांजली हिने केले तसेच अध्यक्षीय सूचना कु.निकिता सूसे हिने मांडली व त्यास कु.नवले ऋतुजा हिने अनुमोदन दिले. यानंतर विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.विद्यार्थी मनोगतामध्ये कु.कळमकर स्नेहा कु.बोरुडे साक्षी कु.श्रेया कळमकर कु.स्नेहल भागवत आदी विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. बारावी विज्ञानची विद्यार्थिनी कु.ऋतुजा राम पोटफोडे हिने प्राचार्य पद भूषविले व बारावी विज्ञान ची विद्यार्थिनी कुमारी साक्षी श्रीराम बोरुडे हिने पर्यवेक्षक पद भूषविले. आज इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका बजावली.विद्यार्थीनी प्राचार्या कु.ऋतुजा पोटफोडे व विद्यार्थीनी पर्यवेक्षिका कु.साक्षी बोरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व विशद केले. माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक अशोक जाधव यांनी आपल्या कर्तुत्वाने शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये दीर्घायुषी होतात असे मत व्यक्त केले,तसेच ज्युनिअर विभागाचे जेष्ठ प्राध्यापक श्री. ज्ञानेश्वर आवारे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या विकासासाठी शिक्षकांचा तसेच आई-वडिलांचा आदर करावा असे मत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आदर्श नीती मूल्य रुजवणारी व्यक्ती अशा शब्दात गौरव केला व शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणतात असे प्रतिपादन केले.रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा अमरापुर चे शाखा व्यवस्थापक महेश कर्डिले, क्लार्क विकास लाड व रमेश देवढे यांनी दरवर्षीप्रमाणे शिक्षकांचा शाळेमध्ये येऊन यथोचित सन्मान केला.विकास लाड यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रेरणेने जीवनाचे सोने करावे अशा शब्दात विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षकांनी करायची दशसूत्री प्रतिज्ञा घेतली.कु.अशमेरा इनामदार हिने समारोप केला. आजच्या या कार्यक्रमाला इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.