सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ६ सप्टेंबर २०२३ गत दहा वर्षांपासून महाराष्ट्रासह देशातील सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपा सरकारने ११५० रूपयाचा गॅस सिलेंडर राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर २०० रूपयांनी कमी करून महिलांच्या तोंडाला पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारचे उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतूक. गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपने ३५० रूपये किमतीचा गॅस सिलिंडर ११५०रूपयांनी वाढवला उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली आणि सबसिडीच्या नावाखाली अनेक गोरगरीब लोकांना लुटले तर देशातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या नावाखाली ऑनलाईन पध्दतीने फिस भरून घेऊन लुटले असून महाराष्ट्रातील वयोवृद्ध गटासाठी असणाऱ्या पेन्शन योजनेत मिळणाऱ्या मानधनात कपात करून महिन्याला मिळणारे मानधन तीन महिन्यांवर केले. २०१४ पुर्वी रिझर्व्ह बँकेच्या खात्यात असणाऱ्या पैशांवर खातेदारांना व्याज मिळायचे परंतू भाजप सरकारने ऑनलाईनच्या नावावर रिझर्व्ह बँकेत डइपॉझइट ठेवणे अनिवार्य केले. यामुळे देशातील श्रीमंत लोकांना काही फरक पडला नाही मात्र या देशातील महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. देशातील ९० टक्के लोकांच्या बँक खात्यातील पैसे आज रोजी खाते माईनसमध्ये गेल्याचे सांगण्यात येते आणि पैसे भरल्यानंतर ते पैसे माईनसमध्ये गेल्याचे नागरीकांना सांगण्यात येते अशा अनेक घटना आणि प्रकार आहेत. ज्यामधून भाजपाने गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला लुटले आहे. हा सर्व घटनाक्रम पाहिला तर देशातील सामान्य नागरिक गरिबी रेषेखालील दबून जात आहे. आणि श्रीमंत लोक श्रीमंतच होत चालले आहेत. नोटबंदीच्या काळात जमा केलेला पैसा काय केला तसेच कोरोना काळात अनेक गोरगरीब बेरोजगार झाले त्यांना आत्तापर्यंत भाजप सरकारने काय मदत केली कोरोना काळात खाजगी कंपनीत काम करणारे अनेक तरूण बेरोजगार झाले भारतातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. असे अनेक प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून घडत आहेत. या घटनाक्रमाकडे पाठ फिरवत भाजप सरकारने आगामी काळात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा वर्षांपासून गॅस सिलेंडरचे भाव वाढले ११५० रूपये एवढे वाढवले आणि आता ११५० रूपयांच्या गॅस सिलेंडरचे भाव २०० रूपयांनी कमी करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महिलांच्या तोंडला पाणी पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे आणि याचे कौतूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या आनंदाने करत असल्याचे मत जनतेतून येत आहे.

