शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासह इतर मागण्यासाठी दि. 5 सप्टेंबर पासून येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या चार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरावरी सराटी येथे आंदोलनादरम्यान झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी वकील संघ व एम आय एम पक्षाच्या वतीने येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणकत्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे .
या आंदोलनाचा तिसरा टप्पा असून दि. ५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन घाडगे, गोपाल कलाने ,शिवाजी पवार, सुदर्शन जाधव या चार युवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संतोष आगलावे, उपाध्यक्ष राजेश हनवते, सचिव वैभव डांगे यास ह वकिल संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर एम.आय.एम. पक्षाचे युथ जिल्हाअध्यक्ष अंजुम लाला, तालुका अध्यक्ष एजाज खान जनाब , अहेमद पटेल, अकिल कुरेशी , शेख आस्लम , उबेद मुजावर , शेख मतीन ,परवेज अहेमद यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
चौकट.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्तांना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता भेट दिली असून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले यावेळी त्यांचे समवेत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर तातु देशमुख , गोपाल अग्रवाल , माजी आमदार विजय खडसे , साहेबराव कांबळे , किशोर भवरे उपस्थित होते.


