अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा:- तालुक्यातील शेतकऱ्यावर चालु खरीप हंगामामध्ये मोठे संकट ओढाऊन आले आहे. विशेष असे की तालुक्यातील
सोयाबीन लागवड केलेले शेतकरी या वर्षी सोयाबिन उत्पादनापासून वंचीत राहणार असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकावर येलोमोझक व खोडकीडी, मुळकुजचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला असुन सोयाबीनचे दाने भरले नसल्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. अश्या आशयाचे निवेदन बुलढाणा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक ॲड.गणेशसिंग राजपूत यांनी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी मोताळा यांना दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी एका परीपत्रकाद्वारे आदेश काढून तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोजेक, खोडकीडा व मुळकुज प्रादुर्भाव ग्रस्त तसेच प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना दिले असून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाने मांगविला असून ॲड.गणेशसिंग राजपूत यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. होणाऱ्या सर्वेच्या परिपत्रकामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झाल्या असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.गणेशसिंग राजपूत बुलढाणा विधानसभा समन्वयक व मोताळा तालुका काँग्रेस, मोताळा युवक काँग्रेस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.