भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य तसेच अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ८ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित 15 व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आबासाहेब काकडे विद्यालय,शेवगाव येथील कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष आय.ए.एस.अधिकारी, पुरुषोत्तम भापकर,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक,बी.जी.शेखर पाटील, आ. संग्रामभैय्या जगताप,डॉ.एस एस दीपक,उपमहापौर गणेश भोसले,मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे,मा.कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या यशाबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे,जि.प. सदस्या,अ.नगर,सौ.हर्षदाताई काकडे,संस्थेचे कार्यकारी अधिकारी, लक्ष्मणजी बिटाळ,प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक सुनील आव्हाड यांच्यामधून तसेच पालक व विद्यार्थ्यांमधून अभिनंदन होत आहे.