मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून, नुकताच भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीवर एलसीबी व पोलीस प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडून 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.वसमत शहरासह ग्रामीण भागात क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार फुलला आहे. तरुण पिढी सट्टाबाजाराच्या आहारी जात आहे. शहरातील बसस्थानक परिसरात 11 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या दरम्यान एका हॉटेलजवळ क्रिकेट सामन्यात ऑनलाइन सट्टा लावत असताना शादूल शेख ख़युम याला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले.याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम होती 11हजार 200रु.च्या रकमेसह रसाहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांबा घेवारे, आकाश यांनी ही कारवाई केली वसमत शहरातील टपरे, शेख, साळवे, भोपे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.