अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा:- आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मोताळा तालुक्यातील बोरखेडी पोलीस स्टेशन ठाणेदार यांना निवेदन देऊन परिसरातील अवैधे धंदे गावठी दारू बंद करण्यात यावे अशी मांगणी वंचित बहुजन आघाडी यांनी केली,बोरखेडी परिसरात जास्त प्रमाणात अवैध धंदे वाढल्या मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे समोर येत आहे,या अनुषंगाने सात दिवसात ही अवैध धंदे बंद न झाल्यास व त्याच्या आत कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करू अशी मांगणी वंचित बहुजन आघाडी ने निवेदनातून स्पष्ट केले,यावेळी वंचित बहुजन आघाडी मोताळा तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे,ता.संघटक गजानन बोराळे, ता.सचिव संदीप गवई,युवराज भिडे,जितू खराटे,नवनीत शिरसाट,राष्ट्पाल खंडारे,सागर धुरंधर,दिलीप वाकोळे, अमोल गवई,सुरेश पवार,मंगेश सुरळकर, अमित गिरे, सुरेश पवार,सद्दाम कुरेशी, शेख फिरोज,सुरेश इंगळे,संजय धुरंधर यांच्यासह शेकडो मान्यवरांची उपस्थिती होती.