सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले – येथील शेंडी बीटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक श्रीनिवास पोतदार यांना राज्यस्तरीय विविध सामाजिक कार्यात अग्रेसर व प्रतिष्ठित नावलौकिक असणा-या ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने सन २०२३-२४ करीता अकोले तालुक्यातील अतिदुर्गम पेसा क्षेत्रातून उत्कृष्ट शैक्षणिक सेवेसाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नेवासा फाटा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य पुरस्कारांचे वितरण नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोरजी दराडे, स्त्री चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधाताई कांकरिया, महंत सुनिलगिरी महाराज, डॉ. वंदनाताई मुरकुटे सभापती पं. स. श्रीरामपूर, निसर्गमित्र प्रमोददादा मोरे, अर्जुन पाटील IFS वन अधिकारी, अशोक कडूस शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर, प्रदिप पाठक तहसिलदार नेवासा, शिवाजी कराड गटशिक्षणाधिकारी पं स. नेवासा, अर्जुन राऊत संस्थापक अध्यक्ष ज्ञानज्योती प्रतिष्ठान इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले. पोतदार यांना हा पुरस्कार म्हणजे पुढील अखंड शैक्षणिक सेवेसाठी सकारात्मक ऊर्जास्रोत असून भंडारदरा शाळेतील विद्यार्थी,पालक व सर्व शिक्षक हेच या पुरस्काराचे खरे मानकरी असल्याची भावना व्यक्त केली. राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनिवास पोतदार यांचे पंचायत समिती अकोलेचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, पोषण आहार अधिक्षक अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, अभयकुमार वाव्हळ, अनिल गायकवाड, एकनाथ भांगरे, सिताराम धांडे, लहू भांगरे, सविता कचरे, केंद्रप्रमुख पुनाजी धांडे, रोहिणी खतोडे, शिक्षक वृंद केंद्र टाकळी, शिक्षक वृंद केंद्र कातळापुर, शेंडी, पांजरे, शाळा व्यवस्थापन समिती भंडारदरा व टाकळी, ग्रामपंचायत सदस्य कार्यकारिणी भंडारदरा व टाकळी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.