प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१३ ऑक्टोंबर,शुक्रवार रोजी परभणी येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळ संवाद बैठकीसाठी पाथरी येथून १६ समाज बांधव,सोनपेठ येथून १८ समाज बांधव,मानवत येथून ५ सेलू येथून ५ व इतर खेडेगावातून समाज बांधव संवाद बैठकीसाठी वैष्णवी मंगल कार्यालय परभणी येथे जमा झाले होते,परभणी शहरातून या परशुराम आर्थिक विकास महामंडळ संवाद बैठकीस समाज बांधवाकडून अपेक्षाही जास्त सहकार्य लाभले. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुरेश रावजी वरपूडकर, आ. राहुल पाटील, आ, रत्नाकर गुट्टे यांचे प्रतिनिधी म्हणून देशमुख हे उपस्थित होते. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळणे हे आवश्यक आहे,आणि जोपर्यंत ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळत नाही, तोपर्यंत आम्ही यांचा सर्वतोपरी पाठपुरावा करून परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळवून देऊ अशी ग्वाही आ. सुरेश रावजी वरपूडकर, व आ. राहुल पाटील यांनी दिली,यावेळी पदुदेव पालन कर व त्यांचे बंधू हे दोघेजण मुंबई येथे परशुराम विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळण्यासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसणार आहेत,यावेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी हे रक्त ब्राह्मणी होते हे गीत सादर करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायक यज्ञेश्वर जी लिंबेकर यांचा पण समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाची सांगतेच्या वेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातून आलेल्या समाज बांधवांचे आभार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की,जोपर्यंत ब्राह्मण समाजाला आर्थिक महामंडळ मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील,असे सर्वानुमते ठरली आहे या कार्यक्रमा वेळी आ.वरपूडकर साहेब,राहुल पाटील साहेब,आसोलेकर गुरुजी,एरंडेश्वर गुरुजी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते सदरील बैठक अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदरील बैठकीमध्ये ना कुठली संघटना कुठला संघ ना कुठला पक्ष केवळ सर्वांचे एकच लक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ,यावेळी विश्वजीत देशपांडे यांनी समाजाच्या व्यथा अगदी योग्य रीतीने मांडल्या त्यांनी मांडलेल्या व्यथा काळजाला मिळणारे होत्या त्यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या व्यथा व्यासपीठावरील मान्यवरांना पण कळाल्या आज समाज कोण्या दिशेने जात आहे, समाजाच्या हाल काय आहेत हे पण त्यांनी सांगितले.विश्वजीत देशपांडे यांच्या मनोगतनंतर आ.वरपूडकर साहेब व.आ.राहुल पाटील साहेब यांनी आश्वासन दिले की परभणी जिल्ह्यात जर ब्राह्मण समाजावर अन्याय होत असेल तर आमच्याकडे केव्हाही या आम्ही पूर्ण मदत करू अशे आश्वासन यावेळी दिले.











