किरण दाडेल
शहर प्रतिनिधी, लोहा
गरीबांना त्यांच्या प्रवाहातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना शासनाने अमलात आणली असली तरी आजही काही शासनाच्या योजनेचा लाभ गरिबांच्या झोपडीपर्यंत धडकलाच नाही. शासनाकडून वितरित होणारे राशन हे गोरगरिबांच्या घरी मिळत नसल्यामुळे बेरळी (खुर्द) येथे सणासुदीच्या तोंडावर सामान्य नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोहा शहरा पासून जवळच असलेल्या बेरळी(खुर्द) हे गाव असुन गेल्या अनेक महिन्यांपासून येथील राशन दुकानदार याची मनमानी चालू असून शासना कडून गरिबांच्या नावावर असलेले राशन वितरीत होत नसल्याच्या या अगोदरही तक्रारी होत्या.परंतु आता या राशन दुकानदाराने मनमानीचा कळस गाठला आहे.बेरळी तेथील लाभार्थी राशन ग्राहक बाळासाहेब बुद्धे हे येथील स्वस्तधान्य दुकानदार रमेश ढेंबरे यांच्या दुकाणावर राशन घेण्याकरिता गेले असता.त्यांना नेहमी प्रमाणे पाच किलो राशन कमी देण्यात आले.या बद्दल लाभार्थी राशन ग्राहक बाळासाहेब बुद्धे यांनी विचारणा केली असता दुकानदार रमेश ढेंबरे यांनी सांगितले की,मी गावातील प्रत्यक लाभार्थी कुटुंबाला पाच किलो राशन हे कमीच देत असतो. मला शासकीय गोदामातून प्रत्येक कट्ट्यामध्ये पाच ते दहा किलो राशन कमी येते मी तर काय करू ? माझी कुठेही तक्रार करा मला काही फरक पडणार नाही.कारण मी वरप्रर्यंत सर्व म्यानेज केले आहे.अशी बेताल वक्तव्य केले.दमदाटी करून अनेक गरीब जनतेला खुलेआम लुटत असलेल्या या राशन दुकानदाराने गरिबांच्या घासाला लुटण्याचा सपाटा लावला आहे.राशन दुकानावर किती प्रकारचा माल येतो ? याची कुठलीच नोंद वही नाही.ना नाम फलक ना व्यवस्थित तराजू. उघडण्याची वेळ व बंद होण्याची वेळ ही दुकानदारालाच माहीत आहे.मस्तवलेल्या दुकानदाराच्या पाठीमागे एक राशन दलालाचे मोठे रॅकेट असल्याची जोरदार चर्चा आहे.हा विषय बेरळी पुरता मर्यादीत नसून संपूर्ण लोहा तालुक्यात हीच बोंब आहे.या संदर्भात पत्रकार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुद्धे यांनी लोहा तहसीलदार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता. तहसीलदार यांनी सांगितले की आपण याबाबतची रीतसर तक्रार देण्यात यावी आम्ही योग्य ती कारवाई करू. त्यावरून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे लोहा तालुका अध्यक्ष बाळासाहेब बुद्धे यांनी दर महिन्याला पाच किलो कमी राशन मिळाल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड, यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, अन्न नागरी अन्नपुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, खासदार नांदेड व लातूर, आमदार लोहा कंधार यांच्याकडे दाखल करण्यात आली असून या तक्रारीवर शासन काय करेल याकडे आता लक्ष लागून आहे.