दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : गेल्या पंधरा वर्षांपूर्वी रेडियम वरील नंबर प्लेटला प्राधान्याने मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत होती अशा मध्ये ज्यांच्याकडे रेडियमवरील हस्तकला प्रभावीपणे अवगत होती अशांकडूनच नंबर प्लेट तसेच गाडीवरील विविध देवी देवतांची रेडियम वरील कलाकृती सकरण्यास प्राधान्य देण्यात येत होते. त्यामुळे अशा कलाकारांना एक चांगला रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला होता. परंतु जसजशी या क्षेत्रामध्ये प्रगती होत गेली, तसतशी या व्यवसायामध्ये उतरणाऱ्यांची संख्याही वाढली. कुठलाच वाहनधारक आपल्या वाहनावर रंगाने रंगवलेली नंबर प्लेट किंवा इतर काही कलाकृती सकरण्यास तयार नव्हते.रेडियम हा घटक रात्रीच्या वेळेस चकाकणारा असल्याने आणि त्याच्यावर केलेली कलाकृतीही डोळ्यांना लोभास वाटत असल्याने सर्व वाहनधारक रेडियमच्या माध्यमातून आपल्या वाहनाला नंबर प्लेट सकरण्यास प्राधान्य देत होते. आणि या कामी पारंगत असलेल्या व्यावसायिकाकडूनच नंबर प्लेट साकारण्यात येत होती. अशात तळोदा शहराजीक असलेल्या आमलाड शिवारात असलेल्या एका पेट्रोल पंप वर एका कलाकाराने गेल्या वीस वर्षांपूर्वी पासून आपला व्यवसाय त्याठिकाणी थाटला होता. याच्याकडे येणाऱ्या वाहनधारकांची संख्याही मोठी होती. विविध राज्यातील ट्रक ड्रायव्हर आवर्जून या ठिकाणी भेट देत आणि याकलाकाराकडून विविध देवी-देवता तसेच आपल्या ट्रकच्या मागील बाजूस शेरो शायरी लिहून घेण्यास पसंती देत होते. त्यामुळे या कलाकारालाही या ठिकाणी योग्य असा रोजगार प्राप्त होत होता परंतु कालांतराने वैज्ञानिक दृष्ट्या याच्या मध्ये बदल होत गेले आणि ही कला यंत्राने हस्तगत केली. विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने रेडियमवर आकार देण्यासाठी एक प्रोफाइल तयार करण्यात येत येऊ लागली.व त्या ठिकाणी ग्राहकांना पाहिजे तसं डिझाईन आकारास येऊ लागलं आणि त्या डिझाईनचे कमांड यंत्राला दिल्यानंतर ते यंत्र रेडियमवर त्याप्रमाणे कटाई करू लागलं त्यामुळे ग्राहकांनाही पाहिजेल तसं डिझाईन उपलब्ध होऊ लागल्यामुळे कम्प्युटर कटाईतून निर्माण झालेल्या विविध डिझाईन्स ग्राहकांना पसंती पडू लागले. याच्यामुळे व्हायचा तोच परिणाम झाला हस्तकला मागे पडू लागली त्याच्यात शासनाच्या वतीने ही भर घालण्यात आली. एक डिसेंबर २०२२पासून सर्व प्रकारच्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात शासनाच्या वतीने सक्ती करण्यात आली. तसा आदेश सुप्रीम कोर्टाच्या वतीनेही जारी करण्यात आला. त्यामुळे या नंबर प्लेट, वाहनाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या कार्यालयातूनच उपलब्ध होऊ लागल्या. रजिस्ट्रेशन करतेवेळी कार्यालयाच्या वतीने नंबर प्लेट साठी फी आकारणी करण्यात येऊ लागली. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वाहनधारकांनी ज्या ठिकाणाहून वाहन विकत घेतले आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी ही नंबर प्लेट फिट करून देण्यात येऊ लागली. यामुळे अशा रेडियम धारक व्यवसायिकांच्या रोजगारावर याचा मोठा परिणाम झाला.जे दिवसभरामध्ये दोन-तीन ग्राहक या ठिकाणी नंबर प्लेट बनवून घेण्यासाठी येत होते तेही आता बंद होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालेला आहे. आता करावे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा येऊन टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने असे सांगण्यात येते की, शासनाने याबाबतीत विचार विनिमय करावा आणि यासंदर्भात आपला निर्णय मागे घेऊन उपलब्ध कलाकारांच्या हस्तेच नंबर प्लेट बनवून घ्यावी. याबाबत वाहनधारकांना सांगण्यात यावे आणि आपल्याकडील स्टिकर ही आम्हास उपलब्ध झाल्यास आम्ही ते लावून देऊ व त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ. अशी विनंती त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
“मी आमलाड शिवारात इंडियन पेट्रोल पंप नजीक सन १९९७ पासून माझा व्यवसाय थाटला आहे. मी ज्यावेळेस दुकान थाटले त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे यांत्रिकीकरण रेडियम च्या बाबतीत झालेल्या नव्हते.त्यामुळे माझ्याकडे ही हस्तकला अवगत होती त्यामुळे समोरचा व्यक्ती देईल ती डिझाईन मी अगदी हुबेहूब या ठिकाणी रेडियम च्या माध्यमातून साकारून देत होतो. त्याच्यामुळे मला चांगला रोजगार प्राप्त होत होता. परंतु शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार व वैज्ञानिक दृष्ट्या झालेली यंत्र निर्मिती यामुळे माझ्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. जे मी दिवसाल १००० रुपये मला मिळत होते माझ्या कलेच्या माध्यमातून ते आता २०० ते ३०० रुपये पर्यंत येऊन ठेपले आहे. त्यामुळे घराचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न माझ्यासमोर तसेच माझ्या सहकाऱ्यांसमोर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शासनाने याबाबतीत योग्य तो विचार करावा एवढीच अपेक्षा.”
- संतोष जोहरी (रेडियम कलाकार तळोदा.जि. नंदूरबार)
चौकोट :
शासनाने ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी ई सेतू केंद्र दिले तसे केंद्र परिवहन विभागाने या रेडियम कलाकारांना द्यावे व त्यांना अधिकृत लायसन्स देऊन त्यांच्या कडून च हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शासनाला सुद्धा महसूल मिळेल व रेडियम कलाकारांचा सुद्धा उदरनिर्वाह चालेल.











